भिंगारमध्ये स्वच्छता रॅली

स्वच्छता अभियान चळवळ व्हावी : खासदार दिलीप गांधी 

भिंगार – स्वच्छता अभियान ही काळाची गरज आहे. कारण निरोगी आणि स्वस्थ भारताच्या निर्माणामध्ये स्वच्छता हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाने स्वच्छता पंधरवड्याच्या प्रारंभनिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण होण्यास निश्‍चित मदत होणार आहे, असे खासदार दिलीप गांधी यांनी यावेळी सांगिले.

कॅंटान्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव, स्कुल समितीचे अध्यक्ष मीना मेहतानी, आरोग्य समिती शुभांगी साठे, सदस्य प्रकाश फुलारी, रवी लालबोंद्रे, शिवाजी दहिहंडे, वसंत राठोड, सॅंम्युयल वाघमारे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष पाटील, पोपटराव नगरे, शांतीकुमार शिरकुल, रमेश साके, गणेश भोर, सुनील शिंदे, मुख्याध्यापिका शामला गाठे, आशालता बेरड, खान खैरमोहंमद उपस्थित होते.

गांधी म्हणाले, स्वच्छता अभियानामध्ये शालेय विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे. स्वच्छता दुताच्या माध्यमातून हे अभियान घराघरापर्यंत नेण्यात निश्‍चित मदत होणार आहे. या अभियानात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे अहमदनगर छावणी परिषदेने मागील वर्षी देशात पाचवा व सदर्न कमांडमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी प्रथम क्रमांक मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

श्रीवास्तव यांनी स्वच्छता अभियान हे अभियान न राहता लोकचळवळ व्हावी, असे आवाहन केले. स्वच्छता निरीक्षक रमेश साके यांनी स्वच्छतेची शपथ उपस्थितांना दिली. खासदार गांधी यांनी झेंडा दाखवून स्वच्छता रॅलीचा प्रारंभ केला. संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अरविंद कुडिया यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष भारूड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)