गोविंदपुरा येथे तीन ठिकाणी चोरी

चोरांनी 47 हजारांचा ऐवज लांबविला

भिंगार – गोविंदपुरा येथील गुरूद्वाराजवळ वसाहतीतील तीन जणांच्या घरी चोरी झाली आहे. बलजितसिंग मोहनसिंग वधवा (वय 34) यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी त्यातून सुमारे 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वधवा यांचे घर बंद होते. त्याचे कुलूप आणि दरवाजा चोरांनी तोडला.

-Ads-

त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम दहा हजार रुपये, 35 हजारांचे दागिने आणि दोन हजारांची चांदीचे नाणी, असा एकूण 47 हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला. चोरांनी वधवा यांच्या घरी चोरी केल्यानंतर त्यांच्या शेजारील रशीद इस्माईल खत्री व लुकमान अरुण खत्री यांच्या घराचे दरवाजे व खिडकी तोडून तेथून ऐवज चोरला आहे.

वधवा यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना चोरी माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वधवा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)