फेसबुक अकाउंटवर बदनामी; अॅडमिनविरोधात गुन्हा दाखल

भावीनिमगाव – केंद्रीय वीज कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षाची फेसबुक अकाउंटवर बदनामी केल्याप्रकरणी ग्रुप ऍडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्‍यातील बालमटाकळी येथील तांत्रिक वीज कामगार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाऊसाहेब बाबासाहेब भाकरे यांची गेल्या सहा महिन्यापासून फेसबुक अकॉउंटवर बदनामी सुरू होती. ऍड. नंदकुमार देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने नगर येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. सहा महिन्यापूर्वी फेसबुकवर वायरमन वायरमन नावाने अज्ञात व्यक्‍तीने अकॉउंट उघडले होते. त्या व्यक्‍तीने राज्यातील अनेक वीज तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यात समाविष्ट करून घेतले. या अकॉउंटच्या माध्यमातून भाऊसाहेब भाकरे व त्यांच्या संघटनेची बदनामी होईल, अशा पोस्ट अकॉउंटवर टाकल्या. या पोस्ट इडिट केल्या गेल्या.

वायरमन वायरमन अकॉउंटमधील लोकांनी त्या टॅग केल्या. त्या अज्ञात व्यक्‍तीने स्वतःची ओळख लपवून बालमटाकळी येथील भाऊसाहेब भाकरे यांची बदनामी कारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. भाकरे यांनी नगर येथील कोतवाली पोलीस व पोलीस अधीक्षकयांना लेखी तक्रार दिली. परंतु त्यांनी फक्‍त एनसी नोंदवून घेतली. त्यावर त्यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयाने कोतवाली पोलीस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया व संहिता कलम 156 (3) प्रमाणे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल कळविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याचप्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्याने फिर्याद क्रमांक. 179/2018 भांदवि कलम 500, 501, 502 आयटी ऍक्‍ट 65,66,67 प्रमाणे वायरमन वायरमन नावाच्या अकॉउंटमधील ऍडमिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)