भाळवणीत विशेष ग्रामसभा खेळीमेळीत

भाळवणी : रूबेला, गोवर लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी येथील बाजारतळाच्या ओट्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लिलाबाई रोहोकले होत्या.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रूबेला व गोवर लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमाची कर्मचाऱ्यांनी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विविध विषयांवर भागूजी रोहोकले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी आमले, संपत कपाळे, ग्रामकार्यकर्ता बी.वाय. रोहोकले आदिंनी शासकीय कर्मचाऱ्यांची कामे, काळू पाणी योजनेच्या अनाधिकृत वीज जोडणी, दैठणे रस्त्याच्या पथदिव्यांच्या आदी विषयांवर प्रश्न उपस्थित केले.

-Ads-

ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी ग्रामसभेचे प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामसभेसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, ग्रामपंचायत सदस्य भागूजी रोहोकले, संदीप व्यवहारे, कोंडीभाऊ तरटे, आप्पासाहेब रोहोकले, सूरज भुजबळ, रमेश रोहोकले, शांताबाई कपाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुलतान शेख, बाबाजी चेमटे, विविध विभागाचे शासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारती चेमटे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)