नवजात मुलींच्या नावे दोन हजारांची ठेव!

आनंदऋषिजीच्या जन्मतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते मिलाप पटवा यांचा उपक्रम

प्रभात सुखद -प्रदीप पेंढारे

-Ads-

नगर – “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश सर्वत्र घुमतो आहे. त्यावर काम करणारे अनेक जण आहे. या उपक्रमात काम करणारे कमी, आणि प्रसिद्धी मिळविणारे जास्त आहेत. परंतु काही जण या उपक्रमावर काम करून “नेकी कर आणि दर्या मैं डाल’, अशी भूमिका बजावतात. हीच भूमिका निभावली आहे, नगरमधील सामाजिक कार्यकर्ते मिलाप पटवा यांनी आनंदऋषिजी हॉस्पिटमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावाने प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव त्यांनी केली आहे. शहर बॅंकेत अशा त्यांनी 11 मुलींच्या नावाने ठेव पावती केली आहे. या ठेव पावतींचे वितरण उद्या (शुक्रवार) होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात आनंदऋषिजीची जन्मतिथ साजरी केली जाते. या महिन्यात जैन धर्मातील अनेक जण सामाजिक उपक्रम करतात. दान, धर्म, गोमातांची सेवा, गरिबांना कपडे-धान्यांचे वाटप, निराधारांना आधार, मिष्टान्नांचे वाटप आदी उपक्रम केले जातात. जैन सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात युवक-युवतींचा मोठा सहभाग असतो.

जलयुक्त शिवाराला जैन सोशल फाऊंडेशनने तीन वर्षात मोठी मदत केली आहे. असे विविध पातळीवर सामाजिक उपक्रम सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते मिलाप पटवा व त्यांच्या परिवाराने आनंदऋषिजीच्या जन्मतिथीच्या महिन्यात आनंदऋषिजी हॉस्टिपमध्ये जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या ठेवी ठेवण्याची योजना आखत तिला आकार दिला आहे.

जैन सोशल फाऊंडेशनचे महावीर भगवान भोजनालय मिलाप पटवा हे गेल्या सात वर्षांपासून अतिशय खुबीने चालवित आहेत. या भोजनालयाची ख्याती अल्पवधीत सर्वदूर पोहचली आहे. हे काम करताना त्यांनी सामाजिक योगदान थांबविलेले नाही. मिलाप पटवा यांनी या महिन्यात आनंदऋषिजीच्या जन्मतिथीनिमित्ताने गोरगरिब गरजूंच्या मुलींना आधार देण्याचे ठरविले.

या उपक्रमाला मिलाप यांच्या पत्नी लिलाबाई, मुलगे अमित, रुपेश पटवा आणि मुलगी शीतल मुनोत यांनीही आनंदाने साथ दिली. मिलाप पटवा यांना आनंदऋषिजी हॉस्पिटलमधून माहिती घेतली. ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये 11 मुलींनी जन्म घेतल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार या मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव पावती शहर बॅंकेत केली त्यांनी केली आहे. या पावतींचे प्रातिनिधीक स्वरुपात उद्या (शुक्रवार) वितरण होणार आहे.

“आनंदऋषिजीच्या आशीवार्दाने सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळाले आहे. समाजाचे नेहमीच देणेकरी असल्याची भावना मनात आहे. यातूनच हा उपक्रम सुचला. या 11 मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. या मुलींना दहा वर्षांनंतर प्रत्येकी दहा हजार रुपये या ठेव पावतीतून मिळतील. उमेदीच्या काळात ठेवीच्या रुपातून पैसे मिळणार असल्याने हा त्यांना दिलासा असणार आहे. – मिलाप पटवा, सामाजिक कार्यकर्ते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)