कालभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त उंबरगावात शुक्रवारी धार्मिक कार्यक्रम

बेलापूर – कार्तिक कृष्ण कालाष्टमीनिमित्त उंबरगाव (ता.श्रीरामपूर) येथे शुक्रवारी ( दि.30) रोजी येथील ग्रामदैवत कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सकाळी 9 ते 11 दरम्यान अभिषेक, दुपारी 12 वाजता आरती होऊन जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

तालुक्‍यातील स्वामी समर्थ सेवेकराच्या वतीने कालभैरवआष्टकाचे सामुदायिक पठण करण्यात येणार आहे. भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-

या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाळासाहेब कोळसे, सोपान ओहोळ, नारायण कोळसे व समस्त उंबरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)