मस्जिद, ईदगाह मैदानास मान्यवरांच्या भेटी

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्‍यातील बेलपिंपळगाव येथे शनिवारी दि.1 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या मज्जीद आणि नव्याने उभारण्यात आलेल्या ईदगाह मैदानाला भास्करगिरी महाराज, सुनीलगिरी महाराज, गोपाल महाराज पाटील यांनी भेट दिली. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, काशीनाथ अण्णा नवले, अशोक कारखान्याचे चेअरमन दिगंबर शिंदे, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर समवेत अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले की अनेक गावे बघितली पण बेलपिंपळगावासारखा एकोपा कुठेही बघायला मिळाला नाही. जात पात न पाळता येथील समाजाचे सर्व लोक एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने राहतात सर्व सण साजरे करतात. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान या ओळीत महाराजांनी गावचे कौतुक केले.

गुलाब पठाण यांनी भास्करगिरी महाराज व सुनीलगिरीजी महाराज यांना वृक्षाची भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमासाठी सिकंदर सय्यद, मुमताज सय्यद, रफिक सय्यद, गुलाब पठाण, आशपाक सय्यद, लतीफ पठाण, फिरोज सय्यद, चंद्रशेखर गटकळ, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब तऱ्हाळ, बहिरट महाराज यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ यांनी केले तर आभार रफिक सय्यद यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)