अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद

बेलापूर ( ता.श्रीरामपूर) - येथे कारेगांव येथे झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बेलापूरात कडकडीत बंद, तसेच सर्वपक्षीयांवतीने मोर्चा काढत बेलापूर पोलिसांना निवेदन दिले. (छायाचिञ- रुपेश सिकची, बेलापूर) 

बेलापूर – कारेगाव ( ता.श्रीरामूर ) येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बेलापूरसह परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. येथील व्यापारी वर्गातून या बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथील झेंडा चौक, पढेगाव रोड, शनीमदिंर रोड, कोल्हार चौक रोड व पेठेत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तसेच बेलापूर येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. येथील विविध संघटनेनी या घटनेचा निषेध नोंदविला, या नराधमाला अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी सर्वपक्षीयांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

सर्वपक्षीयांच्या वतीने हा मोर्चा बेलापूर येथील राजवाडा येथुन मेनरोड ते पोलीस चौकी, तसेच केशव गोविंद मंदिर गल्लीतून ते राजवाडा येथे नेण्यात आला. हा निषेध मोर्चात शाळकरी मुली, महिला सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात आल्यानंतर मोर्चेकरांच्या वतीने शाळकरी मुलींनी बेलापूर पोलिसांना निवेदन दिले.

या निवेदनात, शनिवारी (दि.2) रोजी झालेल्या कारेगाव (ता.श्रीरामपूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या नराधमांला अटक करुन फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी राजु तेलोरे, मोसीन शेख, मयुर खरात, भाऊसाहेब तेलोरे, सुलतान शेख, अनिता खरात, मंगल साठे, मंदाबाई तेलोरे, आशाबाई तेलोरे, शंकुतला भालेराव, चंदाबाई चंदनशीव, रेश्‍मा खरात, रखमाबाई अमोलिक, मीना पारखे, मंगल अमोलिक, कांताबाई तेलोरे, शुभम खरात, पप्पु अमोलिक, अभिजित खरात, प्रमोद अमोलिक, राजु अमोलिक, नितीन खरात, मानु खरात, जयेश अमोलिक आदिसह शाळकरी मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारिपचे सागर खरात, आर.पी.आय.चे मयुर खरात, सचिन अमोलिक या प्रमुखांनी निषेध नोंदविला.

बेलापुर येथील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. तसेच पोलीस कर्मचारी अतुल लोटके, तमनर, आगलावे, राजेंद्र मेहर यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कारेगांव येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास लावून आरोपीवर कडक कारवाई करु असे आश्वासन पी. एस आय. श्रीराम शिंदे यांनी मोर्चेकरांना दिले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष्य ठेवावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)