नगर – बारा बलुतेदार महासंघाची नगर शहर कार्यकारिणी नुकताच जाहीर झाली. अमोल भंडारे यांची शहराध्यक्षपदी, युवा अध्यक्षपदी सुमित बटुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या उपस्थित ही कार्यकारिणी जाहीर झाली.

उपाध्यक्ष- गौरव ताकपिरे, कार्याध्यक्ष- प्रशांत वाघचौरे, सचिव- प्रतिक डहाळे, सहसचिव- युवराज गव्हाणे व सोमनाथ कदम, युवा उपाध्यक्ष- दिपक गुंजाळ, कार्याध्यक्ष- नीलेश आव्हाड, सचिव- किरण लटपटे, सहसचिव- साईनाथ ससाणे तर सचिव- अमोल विधाते यांची वर्णी लागली, तर नगर तालुकाध्यक्ष पदासाठी संतोष गायकवाड यांची निवड झाली असून या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्रे देण्यात आली.

अहमदनगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, सचिव इंद्रजित कुटे यांनी प्रांत-अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहराची कार्यकारिणी जाहिर केली. या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ अध्यक्ष बाबुराव दळवी, जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे, अशोक औटी, श्रीपाद वाघमारे, रमेश बिडवे, प्रमोद गुरव, मनीषा गुरव, प्रा.अमोल खाडे, महेश कुलकर्णी, अनिकेत पाटोळे, मकरंद भिडे, गणेश आटोळे, राहूल अनभुले, अक्रम पठाण, राकेश गालपेल्ली, विशाल दहिवाले, शुभम वैराळ, प्रसाद ताकपिरे आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, बलुतेदार महासंघामुळे आज आपण एकत्र आलो हे एकीचे बळ सर्वसामान्य लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वापरले गेले पाहिजे. बाळासाहेब भुजबळ म्हणाले, प्रत्येक समाजाला आपल्या संत-महंत यांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी कारण्याचा अधिकार आहे. 12 बलुतेदार मध्ये सर्व समाजाला सामावून घेऊन शहर कार्यकारिणी जाहिर केल्याचे त्यांनी सांगितले. बाबुराव दळवी, श्रीपाद वाघमारे, महेश शिंदे, सागर नांदुरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)