कर्जाचा तगादा केल्याच्या रागातून बॅंक शाखाधिकाऱ्याला मारहाण

बेलवंडी पोलीसांनी तक्रार न नोंदविल्याने बॅंक बंद ठेवून केला निषेध

श्रीगोंदा – तालुक्‍यातील कोळगाव येथील सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी मंजूनाथ रत्ना नायक यांना दि.28 रोजी सायंकाळी बॅंकेतून घरी जाताना विनोद सतीश नलगे यानी मारहाण केल्याची घटना घडली . त्यानंतर शाखाधिकारी हे बेलवंडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता बेलवंडी पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी करत शानिवारी बॅंकेचे कामकाज बंद ठेवले होते

-Ads-

मारहाणीचा निषेध व बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास केलेली टाळाटाळ यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी सेंट्रल बॅंक कर्मचाऱ्यांनी शनिवारी कामकाज बंद ठेवून दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त केला. बेलवंडी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला नसल्याने बॅंक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नगर येथे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेतली होती . त्यावर शर्मा यांनी तात्काळ बेलवंडी पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांच्याशी संपर्क साधत संबंधित दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेश दिले त्यानंतर या बॅंक कर्मचाऱ्यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला येऊन मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले .

रात्री उशिरा कोळगाव सेंट्रल बॅंक शाखाधिकारी यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर राजाराम लगड व विनोद सतीश नलगे या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा,मारहाण करणे,शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शाखाधिकारी नायक यांनी दिलेल्या फिर्यादीत दि. 28सप्टेंबर रोजी नायक व त्यांच्या बॅंकेचे काही अधिकारी मधुकर लगड यांच्या घरी कर्ज वसुलीसाठी गेले असता ते घरी नव्हते पण कर्जवसुलीसाठी घरी का गेले याचा राग आल्यामुळे लगड यांनी शाखाधिकारी नायक यांनी फोनवरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती त्यावेळी नायक यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला लगड यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

काल दि 29रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विनोद सतीश नलगे हा कोळगाव येथील सेन्ट्रल बॅंकेत गेला त्याच्या वडिलांच्या नावावर जुने कर्ज असूनसुद्धा तो बॅंकेकडे नवीन कर्ज मागत होता त्यावर अधिकारी नायक यांनी जुने कर्ज फेडल्यावर नवीन कर्ज देऊ असे सांगितले, त्याचा राग आल्यामुळे नलगे याने शाखाधिकारी नायक यांना शिवीगाळ करून धमकावले.

त्यानंतर सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास नायक हे सहकार्यासोबत बॅंकेतून घरी जात असताना विनोद नलगे याने कोळगाव फाट्यावर नायक यांच्या स्विफ्ट कारला दुचाकी आडवी लाऊन स्विफ्ट कारमधील शाखाधिकारी नायक यांना काठीने मारहाण करून परराज्यातून येऊन आमच्या मधूकाका लगडची गाडी ओढून नेणार का मधूकाका ला कर्जवसुलीसाठी का सतावता असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. दिवसभर घडलेल्या घडामोडीनंतर आज रात्री उशिरा कोळगाव येथील मधुकर राजाराम लगड व विनोद सतीश नलगे या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा व गाडी अडवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)