शहर बॅंक कर्ज घोटाळ्याच्या तपासासाठी लेखा परिक्षकांची मदत

पोलीस अधीक्षक यांची माहिती : गुन्ह्यात 16 जणांचे जबाब नोंदविले

आर्थिक शाखेकडे 41 गंभीर तपास

आर्थिक गुन्ह्यांचा तपास हा किचकट असतो. पोलीस अधिकारी तपास करताना कायद्यातील तरतुदी पाहावा लागतात. गुन्ह्याशी कायद्याच्या चौकटीशी सांगड घालावी लागते. या प्रक्रियेत काही गंभीर बाबी सुटू शकतात. नगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. त्याच्याशीच नगडीत असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप देखील गंभीर आहे. सहकारी कायद्याच्या चौकटीतून देखील आर्थिक गुन्ह्याचा अभ्यास करावा लागतो. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा तो अभ्यास असेलच, असे नाही. अधिकारी व कर्मचाऱ्याला तो अभ्यास करावा लागतो. त्यात मोठा वेळ जातो. आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे 41 घोटाळ्यांचे तपास आहेत. या तपासासाठी अधिकारी यांचा सहकार कायद्याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आर्थिक गुन्हे शाखेत, अशाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ वाढविण्यात येणार आहे. या आर्थिक घोटाळ्यांच्या तपासांसाठी लेखा परिक्षकांची देखील मदत घेतली जाणार आहे, असे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

नगर – शहर सहकारी बॅंकेतील कर्ज घोटाळ्याचा तपास करणे आर्थिक गुन्हे शाखेला किचकट ठरू लागले आहे. आर्थिक बाबींची तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. आर्थिक गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास मूळ मुद्यांपासून भरकटत चालल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना तपास करणे सोपा व्हावा, यासाठी लेखा परिक्षकांची मदत घेणार आहे. त्याचबरोबर, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांची संख्या देखील वाढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

शहर सहकारी बॅंकेतील कर्ज घोटाळ्याची व्याप्ती आणि त्याचा तपास मोठा आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तीन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल होताच, तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊन आणि त्याचा तपास सुरू होऊन दीड महिना झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदविले आहेत. गुन्ह्याची व्याप्ती पाहता आणि तपासाची प्रगती पाहता ती खूपच मंद आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे देखील तपासावर नाराज आहेत. त्यांनी त्याची दखल घेतली आहे.

तपास वेगाने सुरू व्हावा यासाठी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत अधिकारी वाढविण्याचा निर्णय बोलून दाखविला आहे. यानुसार तशी चाचपणी देखील त्यांनी सुरू केली आहे. लेखा परिक्षकांच्या नजरेतून या गुन्ह्याचा तपास होईल, अशा अधिकाऱ्याचा ते शोध घेत आहेत. त्याचबरोबर, गुन्हा आर्थिक बाबींशी निगडीत आहे. त्यामुळे तपासासाठी खासगी लेखा परिक्षकाची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसा संबंधित लेखा परिक्षकांची पत्रव्यवहार देखील झाला आहे. या दोन बाबी पूर्ण होताच तपासाला गती मिळेल, असा विश्‍वास पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)