हमीभावाची सरकारी घोषणा फसवीच

आ.थोरात यांची टीका – कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा

 

संगमनेर – सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. हे सरकार शेतकऱ्यांबाबद पुर्ण उदासीन असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांसाठी कायम मदतीची भूमिका घेतली पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

-Ads-

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर होते. तर व्यासपीठावर ऍड. माधवराव कानवडे, रामदास पा. वाघ, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, निर्मलाताई गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

थोरात पुढे म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती व बाजार समितींची निर्मीती केली. शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी सुरु केलेला बाजार समितीचा निर्णय हा पुढे संपुर्ण देशात राबविण्यात आला. बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. अत्यंत काळजीपुर्वक अशी वाटचाल आपल्या बाजार समितीची आहे. बाजार समितीतील व्यापारी चांगले असून शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा आहे. आपल्याकडे उत्पादित होणारे डाळींब हे आपल्या बाजार समितीत विकले गेले पाहिजे

सभापती शंकरराव खेमनर म्हणाले की, बाजार समितीला यावर्षी 3 कोटी 93 लाखांचा नफा झाला आहे. बाजार समितीत कांदा व टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्याचप्रमाणे डाळींबाचेही मार्केट आपण सुरु केले आहे. व्यापारी, शेतकरी, मापाडी व हमाल या सर्वांमुळे आपल्या बाजार समितीची भरभराट झाली आहे. वडगांव पान येथे 16 एकर जागेवर लवकरच अद्ययावत बाजार समितीची शेतकऱ्यांसाठी उभी राहणार आहे.

आमदार थोरात यांचे हस्ते नविन शेतकरी निवास व माथाडी भवन या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रमेश धुळगट, बाजीराव सातपुते, कारभारी गाढे, माधव पांडे, नामदेव थिटमे, कारभारी गीते आदी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतिषराव गोडगे, सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, दादासाहेब गुंजाळ आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे नोटीस वाचन सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार अवधूत आहेर यांनी मानले. यावेळी शेतकरी, व्यापारी, आडतदार, डाळींब उत्पादक, नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)