तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना भरपाई द्या

मुंबई : हमुणी अळीने नुकसान झालेल्या उसाचे पंचनामे व्हावेत, तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

हुमणीचा प्रादूर्भाव चिंता वाढविणारा : आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

नेवासे – तालुक्‍यातील हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महसूल व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, नेवासे तालुक्‍यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात पाऊस नसल्याने कारणाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऊस पिकांवर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रार्दूभाव झालेला आहे. ही अळी उसाच्या मुळावर आघात करते. त्यामुळे पीक जळून चालले आहे. शेतकऱ्यांचे 10-12 महिन्यांचे पीक जळून जाऊन ऊस उन्मळून जमिनीवर खाली पडत आहे.

ऊस पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च झालेल्या आहे. अळीवर शेतकरी बांधवांनी आपल्या कृषी विद्यापीठाने वारंवार सांगितलेली आहे. इतर औषधाचा वापर करून पाहिला आहे. पण या अळींवर याचा परिणाम दिसून येत नाही. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेला आहे. ही तालुक्‍यासह संपूर्ण नगर जिल्ह्याची समस्या आहे. यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार मुरकुटे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)