मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा

संग्रहित छायाचित्र

नगर बाजार समितीचे पणन अधिकाऱ्यांना निवेदन

नगर – खरीप हंगाम 2018 मध्ये नगर तालुक्‍यात मुग व उडीद या पिकाची लागवड मोठया प्रमाणात झाली आहे . तरी प्रशासनाने शासकीय हमी भाव योजने अंतर्गत मुग व उडीद शेतीमालाचे खरेदी केद्र लवकर चालू करावे या संदर्भात कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी बी आर पाटील यांना निवेदन दिले.

नगर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात मुगाचे उत्पन्न झाले आहे . मुग लवकर विकला गेला नाही तर मुगाला किड लागते पर्यायी शेतकऱ्याचे नुकसान होते . सध्या शेतकरी मुग बाजारात घेऊन येत असून या मालाला 4100 – 6100 भाव दिला जात आहे . शासकीय खरेदी केंद्र चालू झाले तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 6975 रूपये शासकीय भाव मिळणार आहे जवळपास प्रति क्विंटल 900 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होणार आह. खरेदी केंद्र चालू करण्यासाठी शेतकरी वर्गाची मागणी आहे .मागील वर्षा मोठया प्रमाणात मुग, उडीद, हरभरा केंद्र चालू होते .

आवक हि चांगली झाली . ऑनलाईन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना बाजार समिती मध्ये हेलपाटे मारण्याची वेळ आली नाही निंबळक गटात मोन्या प्रमाणात मुग चे उत्पादन झाले आहे. या भागातील संचालक संतोष कुलट यांनी केंद्र चालू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे यावेळी कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे , रेवणनाथ चोभे , संतोष म्हस्के , संदिप कर्डीले, दिलीप भालसिंग , संतोष कुलट , बाबासाहेब जाधव ,कानीफनाथ कासार , आव्हाड , बाळासाहेब निमसे , सचिव अभय भिसे , बाबासाहेब खर्से बबनराव ,आव्हाड बहिरू कोतकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)