बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला फुलला बाजार

व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू केल्याने मंदीचे सावट विरळ : शेतकरी उत्साहित

नगर – पावसाने ऐनवेळी दिलेली ओढ ,त्यामुळे उभ्या पिकांनी माना टाकल्या मात्र नंतर दोन-तिन दिवस सलग पाऊस झाल्याने पिके कशीबशी तगली. या संकटातून शेतकरी बाहेर पडतो न पडतो तोच व्यापाऱ्यांवर सरकारने जाचक अटीं लादल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडुन शेतमाल खरेदी करणे बंद केल्याने शेतकऱ्याला आसमानी बरोबरच सुलतानी संकटाचाही सामना करावा लागला. यासर्व कारणांमुळे यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळ आणि मंदीचे सावट राहणार असे वाटत असतांनाच पोळ्याच्या सणा अगोदर दोन दिवस व्यापाऱ्यांनी मालखरेदीस सुरवात केल्याने मंदीची कोंडी फुटली आणि आपल्या लाडक्‍या सर्ज्या-राजाच्या सणासाठी ,त्यांना सजविण्याच्या साहित्य खरेदी साठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करत खिसा सैल सोडल्याचे चित्र पहायला मिळाले.

बळीराजाच्या बरोबरीने शेतात राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा, हा सण साजरा करतांना बळीराजाही कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. तो अपल्या लाडक्‍या सर्ज्या-राजाला घुंगूरमाळ, गोफ, बाशिंग, घंटा, हिंगळ, बेगडानी सजवतो. यंदा या सजावटीच्या साहित्याच्या किंमतीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तरीही पोळ्याच्या पुर्व संध्येला बळीराजाच्या गर्दीने बाजार फुलून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.

शहरातील गंजबाजार भागात पोळ्याच्या निमित्ताने सजावटीचे साहित्याचा बाजार भरला लोकरी गोफ , घुंगुरमाळा रंग, बेगडाचा कागद खरेदीसाठी हा परिसर गजबजला होता.शहरी भागातही मातीचे बैल आणून त्याची पुजा करण्याची प्रथा असल्याने. माळीवाडा चितळेरस्ता , सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणीही बैल आणि पुजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती, त्यासर्व ठिकाणीही खरेदी साठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.

आर्थिक कोंडी फुटली

हमीभाव देण्याच्या जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यात व्यवहार बंद केले होते.आठवडाभर व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली होती. दि.3 रोजी पुणे येथे झालेल्या बैठकित 12 ए.पी.क्‍यु च्या आतील दर्जाचा माल शासनाच्या वतीने खरेदी केला जात असून . अन्य प्रतीचा शेतमाल व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास परवानगी दिल्याने दि.6 पासून व्यवहार सुरू करण्यात आले त्यामुळे शेतकरी बांधवांची झालेली आर्थिक कोंडी फुटल्याचे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी शांतीलाल गांधी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)