हितशत्रुंनी अडचणी निर्माण केल्या, पण हे ही दिवस सरतील

श्रीगोंदा: येथे नगरपरिषदेच्या वतीने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचे अभिष्टचिंतन करताना नगराध्यक्ष मनोहर पोटे, बापुसाहेब गोरे, सुनीता शिंदे आदी. (छाया- अर्शद शेख)

माजी मंत्री बबनराव पाचपुते : श्रीगोंद्यात अभिष्टचिंतन सोहळा; २०१४ ला पैसा जिंकला,काम हरले

श्रीगोंदा – मागे मोठा अपघात झाला पण खरचटलं सुद्धा नाही. अडचणीचा डोंगर उभा केला गेला, पण न खचता न डगमता उभा आहे. हे कार्यकर्त्यांच्या प्रेम अन्‌ तुकोबा व माऊलींच्या आशिर्वादानेच. जनतेमुळे मोठा झालो, पदे मिळाली, मान-सन्मान मिळाला. माझ्या अडचणीत भर घालणारे कोण होते. हे सगळ्यांना ज्ञात आहेत. मी कोणाचे काय वाईट केलं? अडचणी निर्माण करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही, पण हेही दिवस सरतील, असे भावनिक उद्गार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात काढले.

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित रत्नकमल मंगल कार्यालयात अभिष्टचिंतन कार्यक्रमात पाचपुते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस होते. यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले, विकासकामा संदर्भात कधीही घरी बसलो नाही.मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी मांडेल तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला. वाढदिवसा निमित्त एकच संकल्प केला. तालुक्‍याचे गेलेले वैभव परत आणण्याचे अन्‌ राज्यात श्रीगोंद्याचं नाव पुन्हा एकदा झळकावायचे. 25 वर्षाचा हिशोब विचारणाऱ्यांनी चार वर्षात काय दिवे लावले. समोरासमोर येवू चर्चा करावी.

2014 च्या विधानसभेला पैसा जिंकला. अन्‌ काम हरले, पण काम सदैव हरत नाही. तेव्हा मी बेसावध होतो, कार्यकर्ते ही बेसावध होते. आता मात्र तसे होणार नाही. नगरपालिका निवडणुकीमुळे शहरात सगळे कामाला लागले आहे, पण पक्ष घेईल तो निर्णय मान्य करावा लागेल. नगराध्यक्ष मनोहर पोटे प्रास्ताविक करताना म्हणाले की,बबनराव पाचपुतेंनी श्रीगोंदा शहरातील प्रत्येक प्रश्न पोटतिडकीने राज्य शासनापुढे मांडल्याने श्रीगोंद्याचा कायापालट होत आहे. कोट्यवधींचा विकास निधी श्रीगोंद्याला मिळाला. त्यातूनच श्रीगोंद्याची खऱ्या अर्थाने शहराकडे वाटचाल सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने विकासकामा संदर्भात किरकोळ गोष्टीचे भांडवल करणारी मंडळी सक्रिय झाली आहे. शहरवासीयांना विनंती आहे की काही अडीअडचणी असतील तर नक्कीच आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध आहोत. बबनराव पाचपुतेंमुळे शहराला कधीच काही कमी पडले नाही आणि पडणार ही नाही.

यावेळी सदाशिवराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब महाडिक, माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे, छायाताई गोरे, पुरुषोत्तम लगड, बापूसाहेब गोरे, प्रतिभा झिटे, नानासाहेब कोथिंबीरे, अशोक खेंडके, संदिप नागवडे, मिलिंद दरेकर, पोपटराव खेतमाळीस, सतीश मखरे, संतोष खेतमाळीस, सुवर्णा होले, सुनील वाळके आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश पोखरणा यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी मानले.

लोकप्रतिनिधी फसवेगिरी करण्यात दंग-पाचपुते

तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी फसवेगिरी करत आहे. बबनराव पाचपुतेंच्या कामांची कॉपी करण्याचा एकमेव धंदा सुरू आहे. नगरपालिका निवडणूक शांत डोके ठेवून लढावी लागणार आहे. श्रीगोंद्यात कोट्यवधींचा निधी आला. त्यावर कोणी चर्चा करत नाही. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी गांभीर्याने कामे करावे लागेल. टेप घेऊन रस्ता मोजणाऱ्यांना सखोल माहिती घेण्याची गरज आहे, असा चिमटा विरोधकांचे नाव न घेता सदाशिव पाचपुते यांनी घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)