परवानाधारक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ – अविनाश घुले

अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांना पोलिसांचे अभय

नगर – प्रायव्हेट रिक्षा चालकांवर अवैध प्रवासी वाहतुकीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. याला सर्वस्वी शहर वाहतूक शाखेचे पीआय मोरेच जबाबदार असून, त्यांची बदली करणे हाच एकमेव पर्याय आहे. पीआय मोरे म्हणजे पोलीस खात्याला बदनाम करणारे प्रकरण असल्याचा आरोप जिल्हा ऑटो रिक्षा, टॅक्‍सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

-Ads-

यावेळी अविनाश घुले, बाबा अरगडे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतिफ शेख, जितेंद्र शिंदे, गोरख आंबेकर, विलास कराळे उपस्थित होते. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, परवानाधारक रिक्षा चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांच्यावतीने अनेक निवेदन देऊन काहीच फरक पडला नाही. परंतु, दि. 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे धरण्याचे निवेदन दिले होते. त्याची गंभीर दखल पालकमंत्री यांनी घेऊन तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बैठक घेण्याचे सांगून अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्‍न निकाली काढण्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर चर्चा करून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पीआय मोरे यांच्यावरील आरोप ऐकून घेतले व ठोस उपाययोजना होईल, असा विश्‍वास दिल्याने आंदोलन मागे घेतले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)