दोन नगसेवकांची पक्की अतिक्रमणे हटवली

मोहरम विसर्जन मार्गावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

नगर – मोहरम विसर्जन मार्गावर कोठला परिसरातील दोन नगरसेवकांची पक्की अतिक्रमणांबरोबर हातगाड्या, पत्र्यांच्या शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज जोरदार कारवाई केली. विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. यामुळे हा परिसरातील रस्ते 50 फूट अधिकच खुले झाले आहेत. या परिसरात पुन्हा अतिक्रमण झाल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिला आहे.

-Ads-

कत्तल की रात आणि मोहरमची मुख्य विसर्जन मिरवणूक गुरूवारी व शुक्रवारी निघत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोहरम विसर्जन मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. कारवाईची सुरूवात मंगलगेट परिसरातून झाली. याच परिसरात सवाऱ्यांची स्थापना झाली आहे. मंगलगेट येथील हवेलीतून सवारी उठल्यानंतर त्या कोठला परिसरात येतात. याच परिसरात मोठी अतिक्रमणे होती. दोन नगरसेवकांनी पक्‍क्‍या बांधकामांची अतिक्रमणे केली होती. त्यावर पथकाने सुरूवातीला जेसीबी फिरवला. यानंतर पथकाने मागे वळून पाहिले नाही.

फटलण चौकी, कोंड्यामामा चौक, आडतेबाजार, तेलीखुंट, एमजी रोड, भिंगारवाला चौक, लक्ष्मीबाई रोड, पटवर्धन चौक, आनंदीबाजार, सबलेज चौकापर्यंतच्या अतिक्रमणांवर पथकाने कारवाई केली. दरम्यान, कोठला परिसरात सवाऱ्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. येथील अतिक्रमणे हटविल्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोपे होणार आहे. अतिक्रमणे हटविल्याचे समाधान येथील परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)