एटीएमवर वृद्धांची फसवणूक करणारा कालिया गजाआड

सायबर सेलची कारवाई : खबऱ्याच्या मदतीने माग

नगर – एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एकट्या वृद्धांना पाहून त्यांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांच्या सायबर सेलने आज अटक केली आहे. धीरज शिवकुमार कालिया (वय 42, रा. आरटीओ कार्यालयाजवळ, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सारसनगर येथील महात्मा फुल चौकातील एका पान टपरी उभा असताना कालियाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

नारायणदास बन्सीलाल गांधी (वय 84, रा. स्टेशन रोड, नगर ) हे माळीवाडा येथील एका एमटीएमवरून 20 जूनला पैसे काढत कालिया याने त्यांची फसवणूक केली होती. बॅंकेच्या एटीएम पॉईंटवर जाऊन कालिया समोरच्याला गडबडून सोडत होता. त्यावेळी तो टोपी घालायचा. एटीएममध्ये कार्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समोरच्याला तो गडबडून सोडून द्यायचा. पैसे निघत असे बोलून दिशाभूल करायचा.

एटीएममधून पैसे बाहेर येण्याअगोदरच कालिया हा समोरच्याला तुम्ही शेजारच्या बॅंकेच्या एटीएमवर जाऊन पैसे काढा, असे सांगायचा.गांधी यांच्याबाबतही तसेच झाले. गांधी हे एटीएम पॉईंटमधून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांना बॅंकेचे अलर्ट एसएमएस आला होता. बॅंक खात्यातून 20 हजार रुपयांची रक्कम निघाल्याचा तो एसएमएस होता. गांधी हे पुन्हा एटीएमवर माघारी आल्यावर त्यांना तिथे कालिया दिसला नाही.

कालिया हा पैसे घेऊन पसार झाला होता. गांधी यांनी या फसवणुकीची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती. कोतवाली पोलिसांनी ही तक्रार सायबर सेलकडे वर्ग केली होती. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी बारकाईने या तक्रारीचा तपास करत कालियाचा शोध घेतला. बॅंकेमधील सीसीटीव्हीतील माहिती घेतली. चित्रफितीचा अभ्यास केल्यावर कालियाचा चेहरा समोर आला. कालिया याची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांची देखील मदत घेण्यात आली. त्यात देखील पोलिसांना यश आले. एकट्या वृद्धांना एटीएमवर पाहून तो अशीच फसवणूक करत असल्याचे समोर आले. यानंतर कालिया याला सारसनगर येथून ताब्यात घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)