अण्णांसाठी कार्यकर्त्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न!

नगर : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ खा. दिलीप गांधी यांच्या घरावर काढण्यात आलेल्या मोर्चात बीडमधील समर्थक अनिल हजारे याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

खासदार गांधींच्या घरासमोरील प्रकार : जिल्हा प्रशासनाला हिरव्या बांगड्यांचा आहेर

नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी राळेगणसिध्दी ग्रामस्थांचे निवेदन घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून खाली कोणी आले नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला निवेदन चिटकवून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला.

यानंतर आक्रमक आंदोलकांनी मोर्चा भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाकडे वळविला. तेथेही आंदोलकांना कोणीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्याचा आहेर लटकविला. अनिल हजारे नावाच्या आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चपळाई दाखवित हजारे यांचा प्रयत्न हाणून पाडला. अनिल हजारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राळेगणसिध्दी येथील महिला-पुरूष आणि पारनेर तालुक्‍यातील सर्व पक्षीय नेते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एकत्र आले होते. दुपारी तीन वाजता आंदोलनास सुरू करण्यात आली. यावेळी राळेगणसिध्दीचे उपसरपंच लोभेष औटी, सुरेश पठारे, ऍड. शाम आसावा, आजद ठुबे, बाबासाहेब तांबे, राजेंद्र भणगाडे, नीलेश लंके, संजय वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्याने पारनेरकर उपस्थित होते.

नगर :जिल्हाधिकारी कार्यालयावर अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व पारनेरमधील ग्रामस्थांनी आणलेला मोर्चा

या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, संजीव भोर यांनी पाठींबा दिला. सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा दिवसांपासून अण्णा उपाशी आहेत. सरकार जाणिवपूर्वक हजारे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. लोकपाल, लोकआयुक्त, स्वामीनाथ आयोग, शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा, यासाठी अण्णा आंदोलन करत आहे.

साधारण दोन तास आंदोलन झाल्यानंतर पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयातून खाली यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी असमर्थता दर्शविल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला महिलांनी बांगड्या आणि हिरव्या कापडचा हार बांधून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला.

संदेश कार्लेंमुळे आत्मदहनाचा प्रकार लक्षात

सर्वांची नजर चुकवून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील अनिल हजारे यांनी बाटलीतून अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही गोष्ट जवळ असणारे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि हर्षल म्हस्के यांच्या लक्षात आली. हजारे त्या ठिकाणाहून पळू लागला. मात्र, कार्ले आणि पोलीसांना हजारे याला पकडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी पकडल्यावर हजारे हा तरूण अण्णाच्या समर्थनाथ घोषणा दिल्या. यामुळे वातावरण चिघळले. राळेगणसिध्दी ग्रामस्थांनी हजारे याला ओळखले नाही. मात्र, कोतवाली पोलीसांनी केलेल्या ओळख परेडमध्ये हजारे हा आष्टीचा असल्याचे समोर आले.

 

तंबाखूवाले खासदार म्हणून घोषणाबाजी!

नगर :खा. दिलीप गांधी यांच्या घराच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचा आहेर बांधतांना राळेगणसिद्धी येथील महिला.

यानंतर खासदार दिलीप गांधी यांच्या घराकडे आंदोलकांनी मोर्चा वळविला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोर्चा गांधी यांच्या घरासमोर पोहोचला त्यावेळी गांधी यांच्या बंगल्याचे गेट बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता कोणालाही गांधी यांच्या बंगल्यात प्रवेश करू दिला गेला नाही. या ठिकाणी गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

“तंबाखूवाले खासदारांचे कराचे काय? खाली डोक वर पाय’ गांधी यांना निवडूक काळात पारनेर तालुक्‍यात पाऊल ठेवू देवू नका, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संतप्त आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचा आहेर अर्पण केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)