पाण्यासाठी राजकराणविरहित तरुणांचे संघटन महत्वाचे : अण्णा हजारे

पारनेरमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

सुपे – पारनेर तालुक्‍यात पाणी प्रश्नावर लढा उभारण्यासाठी, निलेश लंके प्रतिष्ठान महत्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. यासाठी तरुणांचे राजकारण विरहित संघटन महत्वाचे आहे. समाजकार्यात तरुणांचे संघटन तयार झाले तर, मी एक पाऊल पुढे राहुन सर्वोतपरी मदत करील, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पारनेर शहरात आयोजित कृषीगंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे बोलत होते.

कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निलेश लंके, माजी पंचायत समिती सभापती सुदाम पवार, उपसरपंच लाभेश औटी, अशोक सावंत, सुरेश धुरपते, दादा शिंदे, ऍड. राहुल झावरे, जयसिंग मापारी, संभाजी रोहकले, नगरसेवक नंदकुमार देशमुख, विजय औटी, बापू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सभापती सुदाम पवार यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना निलेश लंके म्हणाले, प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेवटच्या प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी आमचे प्रतिष्ठान कटीबध्द आहे. हाच उद्देश ठेवून प्रतिष्ठानने तालुक्‍यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयी नव तंत्रज्ञान अनुभवयास मिळावे म्हणुन कृषीगंगा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. समाजामध्ये काम करत असताना सामान्य जनतेला आरोग्याची मोठी समस्या भेडसावत आहे.

त्याकरिता भविष्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा मानस आहे. तसेच तालुक्‍यातील बेरोजगार युवकांच्या हाताला कायमंस्वरुपी काम मिळावे यासाठी भव्य नोकरी मेळावा करण्याचे नियोजन करणार आहोत. तसेच मागील महिन्यात तालुक्‍यातील लाखो माता भगिनिंना मोहटादेवी दर्शन घडविल्याचा अनुभव अविस्मरणीय होता. तसेच राजकारणावर भाष्य करताना सांगीतले, आपण पुढील काळात कोणत्याही राजकिय पक्षात प्रवेश करणार नाही. सामाजिक कामात पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर अशोक सावंत यांनी सांगितले की, पारनेर तालुक्‍यात पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी तालुक्‍यातील राजकिय पुढाऱ्यांनी एकत्र येउन लढा उभारल्यास, प्रश्न मार्गी लागतील.

अध्यक्षस्थानावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच प्रतिष्ठानने शेतकरी बांधवांसाठी राज्यस्तरीय प्रदर्शन भरविल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनमध्ये 150 विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कृषी, औद्योगिक, गृहोपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन पहावयास मिळणार आहे. यामध्ये दूध काढणी यंत्रे, छोटी यंत्रे, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, ठिबक सिंचन, पंपसेट, ऑटोस्विच, सेंद्रिय खते, जैविक खते, रासायनिक खते, शेतीविषयक पुस्तके, नियतकालिके, ग्रीनहाऊस, गांडूळखत, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधने, तसेच खाऊ गल्लीचा स्वाद अनुभवास मिळत आहे. तालुक्‍यातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)