बाजारभाव नसल्याने ‘टोमॅटो’ उत्पादकांना लाखोंचा फटका

जनावरे शेतात सोडण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ : किलोला मिळतोय 10 रूपये भाव

अकोले  – टोमॅटोची प्रयोगशील शेती करताना अकोले तालुक्‍याच्या आढळा परिसरातील प्रथमच नागमोती चेरी जातीच्या टोमॅटोची लागवड करण्यात आली. मात्र या टोमॅटोस बाजारभाव नसल्याने शेतकरी वर्गाला लाखोंचा फटका बसला आहे.
आढळा खोऱ्यात केळी, सांगवी, गणोरे, डोंगरगाव परिसरात नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. हिवरगाव, देवठाण, पिंपळगाव निपाणी, टाहाकारी, समशेरपूर व अन्य गावांत टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. गेल्या 5 वर्षांपूर्वी या भागात परप्रांतीय टोमॅटो खरेदीदार व्यापारी येत असत. त्यामुळे येथे बांधावर जाऊन व्यापारी माल खरेदी करतात. त्याचा परिणाम टोमॅटोचे मोबाईल मार्केटिंग जोरात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारंपरिक बियाण्यांना आता टाटा करणारे असंख्य शेतकरी आहेत. आढळा खोऱ्यात केळी, सांगवी ते टाहाकारी, समशेरपूर, सावरगाव पाट, देवठाण, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे ही व परिसरातील गावे अत्याधुनिक साधन सामुग्रीचा वापर करून सर्वच शेतकरी एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

“मे आणि जून महिन्यात या टोमॅटोचा बाजारभाव 200 ते 250 रुपये प्रतिकिलो होता. आताचा बाजारभाव 10 रुपये किलो आहे. निदान 30 रुपये किलो बाजारभाव मिळाला असता, तरी उत्पादन खर्च फिटला असता. परंतु बाजारभाव नसल्याने टोमॅटोचा फडच सोडून देण्याची वेळ आली. – सयाजी सोनू टेमगिरे (शेतकरी, वीरगाव, ता. अकोले)

त्यासारखेच वीरगाव येथे सयाजी सोनू टेमगिरे हे दर हंगामात टोमॅटोची लागवड करतात. यावर्षी त्यांनी प्रयोग म्हणून ‘नागमोती चेरी’ टोमॅटोची लागवड केली. पंचतारांकित हॉटेलमध्ये या टोमॅटोंना मोठी मागणी असते. टेमगिरे यांनी 20 गुंठे क्षेत्रावर हा प्रयोग केला. 220 रुपये प्रतिग्रॅम या दराने बियाणे खरेदी केले. रोपे तयार झाल्यानंतर जुलै महिन्यात लागवड केलेली टोमॅटो चांगली बहरात आली.

मशागतीपासून ते पीक हातात येईपर्यंत त्यांनी 80 हजारांचा खर्च केला. मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे विकत पाणी घेऊन पिकाला दिले. खते, औषधे, लागवड, तोडणी या सर्व खर्चाचा विचार करता सद्यःस्थितीत बाजारभावच नसल्याने टोमॅटोच्या शेतात त्यांनी जनावरे सोडू दिली आहेत.

या वाणाचे झाड सात ते आठ फूट इतके उंचीचे आहे. टोमॅटोचा आकार चेरीसारखा लहान असल्याने तोडणीचा खर्चही मोठा आहे. टोमॅटो बाजारपेठेत जाताना वाहतूक आणि तोडणीचा खर्चही हातात येत नाही. इतर जातीच्या टोमॅटोची बाजारभावाची निश्‍चित शाश्वती नसल्याने टेमगिरे यांनी हा प्रयोग केला होता. परंतु श्रीमंत लोकांच्या आवडीचा आणि पंचतारांकित हॉटेलात मागणी असणारे हे टोमॅटो बाजारभावाअभावी मातीमोल झाले आहेत. फडच सोडून देण्याची वेळ आल्याने टेमगिरे यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांचेही यांचे लाखो रुपये पाण्यात गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)