‘अकोले ते संगमनेर’ मार्गावरील प्रवाशांची आर्थिक लूट

file photo

अकोले  – बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ या आपल्या ब्रीद वाक्‍याशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रतारणा करीत असल्याचा प्रवाशी वर्गाचा आरोप आहे. ब्रीद वाक्‍याचा विसर पडलेल्या परिवहन महामंडळाने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी प्रवाशी वर्गाची मागणी आहे.

संगमनेर येथून अकोल्याला जाताना वेगळे भाडे, तर अकोल्याहून संगमनेरला परतताना वेगळे, अंतर 22 किलोमीटर मात्र अकोल्याहून संगमनेरला जाताना 40 रुपये तर उलट संगमनेरहून अकोल्याला हे भाडे 30 रुपये आहे. यामुळे प्रवाशी वर्गात तीव्र नाराजी आहे. प्रवाशांना आपलीशी वाटणारी बस सध्या दुहेरी भाडे धोरणामुळे डोकेदुखी ठरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या संगमनेर येथील बसस्थानकाचे नवीन बांधकाम अंतिम टप्पात आलेले आहे.अकोल्याहून संगमनेरला जाताना बायपासने जावे लागत असल्याने बसचे भाडे जादा आकारले जाते. मात्र काही प्रवासी संगमनेरला जाताना संगमनेर येथील अकोले नाक्‍यावर उतरतात. अशावेळी भाडे मात्र बायपास मार्गाचे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. संगमनेर येथील डॉ. सुधीर तांबे यांच्या जुन्या दवाखान्यापासून बसस्थानकात जाण्यासाठी उभारलेल्या गेटमधून बसस्थानकात काही बसेस जातात. त्यामुळे अकोले संगमनेरचे भाडे कमी होणे गरजेचे आहे.

मात्र जिल्हा नियंत्रकांचा आदेश नसल्याचे कारण देत जादा भाडे आकारले जात आहे.त्यातच 15 टक्क्‌यांपेक्षा जास्त हंगामी भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री लागत आहे. अकोले ते संगमनेर प्रवास करण्यासाठी तब्बल 40 रुपये एका व्यक्तिला मोजावे लागत आहेत. एक बाजूला नियमावर बोट ठेऊन कर्मचारी प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेत नाही व प्रवाशांचे म्हणने वरिष्ठापर्यंत पोहचवत नाही. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी वाहनांकडे वळताना दिसत आहेत. ही बाब परिवहन प्रशासनाने गांभिर्याने घ्यावी व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)