विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखाला निलंबित करा

बीडीअोंना निवेदन : प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या गंभीर तक्रारी

अकोले -मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या अकोले पंचायत समितीतील विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखास निलंबन करुन चौकशी करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समन्वय समिती आणि अकोल्यातील पत्रकार संघटनांनी केली. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी गंभीर तक्रारी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केल्या आहेत.

अकोले पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराविषयी लक्ष वेधणारे 20 मुद्याचे निवेदन नुकतेच गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे यांना देण्यात आले. उपसभापती मारुती मेंगाळ, गट शिक्षणाधिकारी प्रभारी अरविंद कुमावत यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून महिलांसह शिक्षकांना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, केला जाणारा भावनिक, मानसिक छळ, वादग्रस्त आर्थिक मुद्दे, टॅब खरेदीचे वादग्रस्त प्रकरण, शिक्षकांना दिली जाणारी नियमबाह्य अशैक्षणिक कामे, महिला शिक्षकांना रस्त्यात, चौकात अडवून जाब विचारणे, किरकोळ कारणावरुन दिल्या जाणाऱ्या नोटीसा आदि मुद्यांकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी जालिंदर खताळ आणि केंद्रप्रमुख सुनंदा दिकोंडा यांना निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शिक्षक नेते सुनील बनोटे, अण्णासाहेब आभाळे, सुभाष बगनर, सुधीर बोऱ्हाडे, राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर, शिक्षक बॅंकेचे संचालक बाळासाहेब मुखेकर, गंगाराम लेंडे, प्रशांत गिते, मनीषा वाकचौरे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. उपसभापती मेंगाळ यांनी शिक्षकांच्या भावना आणि तक्रारी रास्त असल्याचे सांगत तक्रार असलेल्या संबंधित अधिकारी वर्गावर योग्य ती कायदेशीर कारवाई करु असे सांगितले.

गटविकास अधिकारी रेंगडे आणि गट शिक्षणाधिकारी कुमावत यांनी निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी कारवाईची मागणी केली. अकोले तालुका पत्रकार संघाने कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे.अध्यक्ष विजय पोखरकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

शिक्षक रजा टाकून निवेदन द्यायला आले होते. सर्वांच्या भावना तीव्र होत्या. शिक्षण विभागाच्या कारभाराबद्दल तालुका भरातल्या शिक्षकांमध्ये मोठा असंतोष धुमसत असल्याचे चित्र बघायला मिळाले. आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य जालिंदर वाकचौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्या भेटी घेऊन शिक्षक समन्वय समितीने कारवाईची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)