राम कदमांच्या बेताल वक्‍तव्याचा अकोल्यात निषेध

अकोले : राम कदम यांच्या वक्‍तव्याचा निषेध करणारे निवेदन तहसीलदारांना देताना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी व इतर.

अकोले  – भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेल्या विधानाचा अकोले तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज निषेध करण्यात आला. बेताल वक्‍तव्य करणाऱ्या कदम यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एका बाजूला बेटी बचाव बेटी पढाव असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. तर दुसरीकडे बेटी भगाव असे बेताळ विधान करणाऱ्या आमदारावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्या वक्‍त्याव्याचे भाजप सरकार एकप्रकारे समर्थन करीत आहेत. याप्रकरणी आमदाराला त्वरीत अटक करून गुन्हा दाखल करावा व आमदारकी रद्द करून निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

यावेळी तालुका महिलाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, नगराध्यक्ष संगीता शेटे, पं. स. माजी सभापती अंजना बोंबले, युवती अध्यक्षा शीतल तिकांडे, नगरसेवक स्वाती शेणकर, विमल भोईर आदींनी त्यांच्या भाषणातून कदम यांच्यावर टीका केली. आंदोलनास कीर्ती गायकवाड, निशिगंधा नाईकवाडी, कुमुदिनी पोखरकर, माधवी जगधने यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, सचिन शेटे, राहुल देशमुख, संदीप शेणकर, परशुराम शेळके, विजय पवार आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)