अकोले शहरासह परिसरात सहा इंच पाऊस

जोरदार पावसाने अकोले येथील व्यापारी संकुलात पाणी साचले होते.

निळवंडे येथे दोन, कोतूळला एक इंच पावसाची नोंद : अर्धा कोटीचे नुकसान

अकोले -खरीप हंगामात दडी मारून बसलेल्या लहरी पावसाने काल (दि. 4) रात्री 11 ते आज (दि.5) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत धुव्वॉंधार बॅटिंग केली. अवघ्या साडेसहा तासांमध्ये अकोले शहर व परिसरात सहा इंच विक्रमी पावसाची नोंद झाली. निळवंडे येथे दोन व कोतूळ येथे एक इंच पावसाची नोंद झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पावसाचा फटका अकोले येथील 15 हून अधिक व्यापाऱ्यांना बसला.त्यात त्यांचे सुमारे अर्धा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या बिगर मोसमी पावसाने अकोलेबरोबरच निळवंडे, कोतूळ व अन्य पूर्व भागात हजेरी लावली. पूर्व बाजूने आलेला लहरी पाऊस पश्‍चिमेकडे मात्र भंडारदरा धरणावर शिंतोडे टाकून पसार झाला.

मागील दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. मात्र दोन दिवस तो चांगला बरसला. पावसामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करून सामान्य नागरिकांना ऐन दिवाळीत अंधारात बसवले. या पावसामुळे ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

आज रात्री सायंकाळपर्यंत तहसीलदार मुकेश कांबळे व ग्रामअधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी साई संकुल, सोसायटी कॉम्प्लेक्‍स, स्टेट बॅंकेसमोरील देशमुख कॉम्प्लेक्‍स आणि बसस्थानक परिसर व अन्य ठिकाणच्या तळ मजल्यावर असणाऱ्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुकानातील माल भिजल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे या दुकानदारांनी ऐन दिवाळीत आपले शटर खाली करून आपल्या वेदनांना अधिकाऱ्यांपुढे वाचा फोडली.

पावसामुळे सतीश सूर्यभान वाकचौरे, सुशीला रामनाथ करवर, प्रल्हाद रामनाथ जाधव, सुभाष कांतीलाल शहा, सुभाष तुकाराम खरात, संजय मुरलीधर नाईकवाडी, किरण श्‍याम वामन, दिलीप हरिभाऊ वामन, कैलास कारभारी चव्हाण, संभाजी यादव भिंगारे, रोहन शहा, रफिक बशीर शेख, आनंदा गोविंद शेळके, कैलास सहादू जाधव, दिलावरखान मूनवरखान पठाण, दीपक जगन्नाथ वाघ, प्रशांत सुधाकर गायकवाड यांचे मोठे नुकसान झाले.

या पावसामुळे उसाचे पीक आडवे झाले, तर नवीन लागवड झालेल्या कांदा पिकाला शेतात पाणी साठल्याने फटका बसलेला आहे. अन्य पिकांनाही या पावसामुळे झळ बसलेली आहे. यादरम्यान अगस्ती सहकारी साखर कारखाना ऊस तोडणी कामगारांना या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर आला. त्यामुळे त्यांना ऐन दिवाळीत अन्य ठिकाणी आश्रय शोधावा लागला.

जायकवाडीचे आवर्तन सुरू आहे. पावसाचे निमित्त करून महावितरण कंपनीने वीजपुरवठा तब्बल 15 तास खंडित करून जनतेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान विजांचा कडकडाटाट आणि ढगांचा गडगडाट सुरूच राहिल्याने लोकांमध्ये भीती होती. दरम्यान, मेहेंदुरी येथे विकास फरगडे यांच्या घरा समोरील नारळाच्या झाडावर काल रात्री वीज कोसळली. मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)