पिचडांच्या प्रकृतीची पवारांकडून विचारपूस 

अकोले – राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पिचड यांना काही दिवसांपुर्वी थकवा जाणवू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हायरल इन्फेक्‍शन झाल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. लिलावतीचे प्रख्यात डॉ. कॉर्नलूई वॉर्ज हे त्यांचेवर उपचार करीत आहे. रुग्णालयाच्या विश्‍वस्त रेखबहन मेहता स्वतः लक्ष ठेवून आहेत.

त्यांच्या समवेत आमदार हेमंत टकले, आमदार पांडुरंग वरोरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे होते. यावेळी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, अगस्तीचे संचालक सुरेश गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, राजेंद्र गुंड यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)