अकोले नगरपंचायतीची आम सभा बोलवावी

अकोले – अकोले नगरपंचायतीची स्थापना होऊन 4 वर्षे उलटली, तरी अद्याप एकदाही आमसभा झालेली नाही. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे व्यासपीठ असलेली आमसभा लोकप्रतिनिधींना बोलाविण्याचा अधिकार असतो. तरी आमदार वैभवराव पिचड यांनी आमसभा बोलवावी, अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दलित मित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे.

साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोल्यात जोपर्यंत ग्रामपंचायत होती, तोपर्यंत दर तीन महिन्यांनी ग्रामसभा होत असे. त्यामध्ये जनतेला आपले प्रश्‍न मांडण्याचा अधिकार व हक्क होता. परंतु नगरपंचायत झाल्यापासून कायद्यात तरतूूद असताना देखील एकदाही आमसभा झालेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपंचायत झाल्यानंतर अकोलेकरांच्या सोई-सुविधांमध्ये वाढ होईल, असे वाटले होते. मात्र परिस्थिती याउलट झालेली आहे. अकोले शहरात सध्या नागरी सुविधांचा अभाव आहे. शिवाय अनेक विकासकामे खोळंबलेली आहेत. वाढलेली पाणीपट्टी, घरपट्टी, बांधकाम परवानगीसाठी अनेक जाचक अटी, व्यवसायाचा अगर रहिवासी दाखल्यासाठी भरमसाठ शुल्क, अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

तसेच सध्या कोणताही दाखला मिळविण्यासाठी मार्च 2019 पर्यंतची बाकी भरा, त्यानंतर दाखला मिळेल, असे सांगितले जाते. हा अकोलेकरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रश्‍न, भूमिका मांडण्यासाठी अकोले नगरपंचायतची आमसभा बोलवावी, अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)