निळवंडे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सहकारी संस्थेत समावून द्या

संग्रहित छायाचित्र.........

कृती समितीचे सचिव आभाळे यांचे आ. कोल्हे यांना पत्र

अकोले – निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन करण्यासाठी सर्वप्रथम प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा, म्हणून आर्थिक निधी उभारावा तसेच त्यांच्या मुलांना आपल्या सहकारी संस्थांमध्ये नोकरी देवून सामावून घ्यावे, असे विनंती करणारे पत्र निळवंडे धरणग्रस्त कृती समितीचे सचिव यशवंत आभाळे यांनी आ. स्नेहलता कोल्हे यांना दिले आहे.

-Ads-

निळवंडे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्व. शंकररावजी काळे समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीमध्ये स्व. दत्ता देशमुख समितीचे सदस्य होते. काळे समितीने पूनर्वसनाच्या बाबतीत शिफारसी सूचवितांना निळवंडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अतिअल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील सहकारी संस्थांनी आर्थिक निधी उभा करुन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याचे मान्य केले होते. तसेच लाभक्षेत्रातील असलेल्या सहकारी संस्थांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्यामध्ये सामावून घेण्याची शिफारसही समितीने केली होती.

मात्र त्यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी निळवंडे धरणाचा फायदा कोपरगाव तालुक्‍याला होणार नाही. त्यामुळे संजीवनी साखर कारखाना आर्थिक निधी उभा करणार नाही व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सहकारी संस्थांमध्ये नोकऱ्याही देणार नाही असे मत व्यक्‍त केले होते. आज मात्र कोपरगाव शहरासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन नेण्याची योजना आपण तयार करीत आहात.

मुळातच निळवंडे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आपले कोणतेही योगदान नाही, असे परखड मत नोंदवून प्रकल्पग्रस्तांची मुले नोकरीपासून वंचित आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. पाणी हवे असेल तर त्यागाची भूमिका घ्या, असे स्पष्ट करून आपणास निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन करावयाची असेल तर सर्व प्रथम प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा म्हणून आर्थिक निधी उभारा व त्यांची मुले आपल्या सहकारी संस्थांमध्ये नोकरी देवून सामावून घ्या व कोपरगावसाठी थेट पिण्याची योजना आखा असेही आभाळे यांनी त्यात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)