दिल्लीतील किसान मोर्चास शेतकरी रवाना

अकोले  – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठवण्यासाठी नवी दिल्ली 29 व 30 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे चार ‘किसान मार्च’ निघत आहेत. त्यासाठी देशभरातून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 180 संघटनांच्या सहभागातून एक लाख शेतकरी किसान मार्चमध्ये सहभागी होत आहेत. नगर जिल्ह्यातील शेतकरीही दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट भाव, शेतकरी पेंशन, दुष्काळ, विमा, जमिनीचे हक्क आदी शेतकरी प्रश्‍न या किसान मार्चमध्ये उपस्थित केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चेसाठी संसदेचे स्वतंत्र सत्र आयोजित करावे, अशी मागणीही किसान मार्च मध्ये करण्यात येणार आहे.

-Ads-

देशभरातील शेतकरी दिल्लीच्या चारही रस्त्यांवर आज रात्रीतून पोहचतील. उद्या (दि. 29) 11 वाजता चारही बाजूंनी रॅली सुरू होईल. सायंकाळी 6 वाजता ते रामलीला मैदान येथे पोहचतील. दुसऱ्या दिवशी (दि. 30) सकाळी रामलीला मैदानातून संसदेकडे मार्च निघेल. दुपारी संसद मार्ग येथे पोहचल्यावर किसान संघर्ष समन्वय समितीचे नेते मार्चला संबोधित करतील, असे डॉ. अशोक ढवळे, आ. जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे आदींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)