युवकांनी केली सामाजिक संघटनेची स्थापना

अकोले  – अकोलेतील सर्वपक्षीय युवकांनी एकत्रित येत शिवसेनेचे युवा नेते व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश नवले यांच्या नेतृत्वाखाली ‘युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेची’ स्थापना केली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संघटना स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप शेणकर होते.

यावेळी सोमनाथ नवले, रोहिदास चव्हाण, नानासाहेब दळवी, सुमेध मालुंजकर, श्रीकांत चौधरी, तुषार आंबरे, अतुल लोहटे, खंडू निवृत्ती वैद्य, गणेश अस्वले, सुनील लोखंडे, किरण चौधरी, रावसाहेब भोर, वकील लक्ष्मण यादव, रोशन जाधव, शरद पानसरे, अनिल वाकचौरे, मकरंद वाकचौरे, प्रा. विकास नवले, तुकाराम वाळुंज, सचिन वाळुंज, राजेंद्र आरोटे, अवधूत कासार, सुनील घुले, रवींद्र जगदाळे, साहेबराव नवले, राजेंद्र आभाळे, सचिन देशमुख, अमोल वैद्य, संकेत मंडलिक, एकनाथ शेटे, चंद्रकांत शेटे, दत्ता पंढरीनाथ नवले, गणेश तोरमल, अमोल शेळके, दीपक शेटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महेश नवले म्हणाले, युवा स्वाभिमान संघटना ही राजकारण विरहित आहे.तरुणांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना योग्य दिशा दाखवणे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणे, समाजातील चांगल्या लोकांच्या कार्याचा गौरव करणे, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत राहील. तालुक्‍यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व आघाड्यांवर आलेली मरगळ झटकण्याचेही काम ही संघटना करणार आहे.

यावेळी डॉ. अजित नवले यांनी संघटनेच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प.चे माजी सदस्य बाजीराव दराडे, पं. स.चे उपसभापती मारुती मेंगाळ, म्हाळादेवीचे सरपंच प्रदीप हासे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विलासराव आरोटे, अगस्ती देवस्थानचे विश्‍वस्त दीपक महाराज देशमुख, रोहिदास धुमाळ, डॉ. शिवाजी नवले, नामदेव गोर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नीलेश तळेकर यांनी केले. स्वागत गणेश तोरमल यांनी, तर सूत्रसंचालन सुरेश नवले यांनी केले. आभार राजेंद्र कुमकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)