अगस्ती पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास कायम- गायकर

अकोले – नोटबंदीच्या काळात ठेवी परत मागितल्या, त्यांना त्या दिल्या. शिवाय कर्ज मागणाऱ्या कर्जदारांना कर्जही दिले. त्यामुळे अगस्ती ग्रामीण पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास कायम असल्याचे उघड झाले आहे, असा दावा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व या पतसंस्थेचे संस्थापक संचालक सीताराम गायकर यांनी केला.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बॅंकेच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

गायकर म्हणाले, संस्थेच्या ठेवी 97 कोटी रुपयांच्या घरात आहेत. पतसंस्था आर्थिक परिस्थितीने अतिशय उत्तम असून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत आहे. या ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षीत असून भितीचे कोणतेही कारण नाही.असा निर्वाळाही त्यांनी दिला.पतसंस्थेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर वसुलीची कायदेशीर कारवाई करून जवळपास 500 एकर जमीन संस्थेच्या मालकीची झाली आहे. या पुढच्या काळात या जमिनीच्या विक्री लिलावासाठी अन्य तालुक्‍यातील धनकोंना बोली बोलण्याला पाचारण करून ती जमीन विकण्याचा प्रयत्न संस्थेने करावा आणि ठेवीदाराचा विश्वास आणखी वृद्धींगत करावा, असे आवाहन गायकर यांनी केले.

-Ads-

यावेळी संचालक कचरू पाटील शेटे, गुलाबराव शेवाळे, अशोक देशमुख, बाळासाहेब देशमुख, सुरेश गडाख, भाऊसाहेब काळे, प्रकाश नाईकवाडी, अनिल कोळपकर, रमेश धुमाळ, निवृत्ती साबळे, राधाकिसन धुमाळ, पोपट शेवाळे, दिनकर आवारी, भाऊसाहेब वाळुंज उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालन अनिल गायकवाड यांनी केले तर संचालिका अलका मंडलिक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)