अकोल्यातील गणेश मंडळांवर सीसीटीव्हीची करडी नजर

77 गावात एक गाव एक गणपती..

अकोले पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत मोडणाऱ्या 77 गावांमध्ये मएक गाव-एक गाव गणपतीफचा नारा लगावला गेला आहे. या गावात व्यक्‍तिगत घरातील गणेश स्थापना वगळता प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणी फक्‍त एकाच गणेशाची स्थापना केली गेली आहे. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी होणार आहे. खेरीज तरुण 51, बाल 17, खासगी 12, एक गाव एक गणपती 77 अशा एकूण 157 मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापणा केली.

अकोले – शहारातील गणेश मंडळांवर व वाकडे पाऊल टाकणाऱ्या अपप्रवृत्तींच्या लोकांवर या वर्षी सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. यासाठी अकोले नगरपंचायत मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली, तर 157 मंडळांनी गणेश श्री गणेश स्थापना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरात परवानगी घेवून हिंदूराजा यूथ फाउंडेशन, अगस्ती विद्यालय, मैत्रेय बहुद्धेशीय, मॉडर्न हायस्कूल, मथुरानगर, आयटीआय, सह्याद्री, जाणता राजा, राजे छात्रपती (कारखाना), शिवतांडव प्रतिष्ठान (श्रमिक), सिद्धेश्‍वर, मराठा वॉरीयर्स (धुमाळवाडी रस्ता), खटपट नाका, शिवशक्‍ती तरुण मंडळ (गुरव झाप), पॉलिटेक्‍निक या मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे.

शिवसेना मंडळाने स्थापना केली नाही. तर शंभूराजे मंडळाने परवानगी घेतलेली नाही, असे सांगून या वर्षी जाणीवपूर्वक सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. त्यात सर्व बाबी टिपल्या जाणार आहेत. प्रसंगी त्याचा वापर करून आवश्‍यक तेव्हा अपप्रवृत्ती गजाआड करण्यास पोललीस मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)