मद्यविक्रीते, मद्यपी अन्‌ जुगारी रडारवर… 

अकोले शहरात सीसीटिव्हीची गरज; वेळ पडली तर अटक करणार- थोरात 

अकोले – गणेशोत्सव व मोहरम हे दोन सण एकत्र येत आहेत. या काळात सामाजिक सलोखा टिकावा, यासाठी कायद्याचे सर्वानी पालन करावे. असे आवाहन करुन उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांनी या काळात अवैध मद्यविक्री करणारे, मद्यपी व जुगारी हे पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत. वेळप्रसंगी त्यांनी अटक केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. याकाळात सीसीटीव्हीची गरज आहे. यासाठी सेवाभावी मंडळ प्रमुखांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

अकोले तालुका गणेश मंडळे प्रमुख, पोलीस पाटील व सेवाभावी संघटनांचे प्रमुखांची संयुक्त बैठक येथील अकोले महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात झाली. त्यावेळी थोरात बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मुकेश कांबळे होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नगर पंचायतीच्या अध्यक्ष संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, अरीफभाई तांबोळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण निकम, वीज वितरणचे ज्ञानेश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

कोळपेवाडी येथील दरोड्यातील गुन्हेगार केवळ सीसीटीव्हीमुळे पकडले गेले. असे निदर्शनास आणून देत थोरात यांनी या काळात महिलांची होणारी छेडछाड, मूर्ती विटंबना, अन्य प्रकार हे सामाजिक अस्वस्थता निर्माण करतात.त्यातील गुन्हेगार यामुळे पकडले जाण्याला मदत होईल असे ते म्हणाले. गणेश स्थापनेचा मंडप जागेच्या अथवा रस्त्याच्या 60 टक्‍के उभारावा.रहदारी अडथळा येणार नाही. याकडे गणेश मंडळ अध्यक्षांनी लक्ष द्यावे, असे सुचवून थोरात यांनी डीजे बंदी, अकोलेवासीयांमुळे विना बंदोबस्त होणारा विसर्जन सोहळा, याबाबत भाष्य करताना कायदा मोडणाऱ्या व्यक्‍तींना सोडले जाणार नाही. मात्र सर्वानी देवू केलेल्या सहकार्याबद्धल थोरात यांनी समाधान व्यक्‍त केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक (एनएसएस) यांची मदत घेतली जाईल असे सांगितले.

तहसीलदार मुकेश कांबळे यांनी अकोले हे सांस्कृतिक उत्सवाचे शहर आहे. या शहरातील जनतेने गणेशोत्सव व मोहरम हे दोनही सण उत्साहात व एकोप्याने साजरे करावे असे आवाहन केले. खेरीज शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे, असे सांगून डीजे बंदी झाली पाहिजे. असा आग्रह धरला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ निकम, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष शंभू नेहे, कॉंग्रेस युवा अध्यक्ष निखील जगताप, अमोल वैद्य, मौलाना मौजूद हाफिज, प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, संदीप शेणकर, पोलीस पाटील अशोक नवले (इंदोरी), शिवाजी हांडे (ब्राह्मणवाडा), पोलीस पाटील सरिता गायकर (मोग्रास) आदींची यावेळी भाषणे झाली.

यावेळी गत वेळेस विजेत्या ठरलेल्या मंडळाना बक्षीसे दिली गेली. त्यात मैत्रेय (अकोले), जय भवानी (कोतूळ), जय मल्हार (बिबदरावाडी,समाशेरापूर) या क्रमवार पहिल्या तीन मंडळाचा समावेश होता. स्वागत पोलीस उप निरीक्षक विकास काळे यांनी केले. सूत्रसंचालन करून आरिफभाई तांबोळी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)