अनुपस्थित अधिकाऱ्यांना देणार कारणे दाखवा नोटीस

अकोलेत ग्राहकदिनास अधिकाऱ्यांची गैरहजेरी

अकोले – अकोले तहसील कार्यालयात 32 वा राष्ट्रीय ग्राहक दिन पार पडला. यावेळी अकोले नगरपंचायतीने आकारणी केलेल्या अवाढव्य करावर विशेष चर्चा झाली. तसेच जे अधिकारी उपस्थित नव्हते, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सूचित केल्याचे ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहक दिनाच्या बैठकीस अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, रमेश राक्षे, ऍड. दीपक शेटे व इतर पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या हक्काविषयी बाजूू मांडली. अकोले नगरपंचायतीकडून जास्त कर आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी यावेळी अनेकांनी मांडल्या. अकोले तालुक्‍यात अवैध वृक्षतोड भंडारदरा व रंधा परिसरात सुरू असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच वृक्षतोड करणारी वाहने व त्यांचे क्रमांकासह फोटो संबंधित अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्‍वासन संबंधित वन अधिकाऱ्यांनी दिले.

अकोले तालुक्‍यात घरपोहोच गॅस सिलिंडर मिळावे. काही गॅस ग्राहकांकडून घरपोहोच सिलिंडरचे अतिरिक्त पैसे घेतले जातात. विशेष करून अकोले शहरामध्ये ते घेण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. अकोले बसस्थानकामध्ये नेहमी अवैध वाहतूकदार व त्यांच्या गाड्या, तसेच जुगार, मटका सकाळपासूून रात्री उशिरापर्यंत चालू असतो. याबाबत पोलीस नेहमीच काना डोळा करतात असा विषय काही ग्राहकांनी मांडला. रस्त्यावर खड्डे पडल्याचाही विषय यावेळी मांडला गेला.

यावेळी नायब तहसीलदार बी. जी. भांगरे, पुरवठा निरीक्षक राकेश रावते, जयश्री वाडगे या अधिकाऱ्यांसह भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ग्राहक पंचायतीचे राम रुद्रे, ऍड. भाऊसाहेब वाळुंज, प्रा. डॉ. सुनील शिंदे, भाऊसाहेब गोर्डे, माधवराव तिटमे, शोभा दातखिळे, भाऊसाहेब वाकचौरे, प्रतिभा सूर्यवंशी, मंगल मालुंजकर, गणपत शेळके, सखाहरी पांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्राहक पंचायतीचे सह-संघटक रमेश राक्षे यांनी केले, तर आभार ग्राहक पंचायतीचे सचिव दत्ता शेणकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)