करवाढ मागे घेण्यासाठी नगरपालिकेस निवेदन

अकोले : अकोले नगरपंचायतीने सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी विविध करांमध्ये वाढ केलेली आहे. ही करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

नगरपंचायतीने यावर्षी ‘युजर चार्जे’स या नावाने प्रथमच कर आकारणी सुरू केलेली असून, प्रत्येक घर, व्यवसायामागे प्रत्येकी 300 ते 600 रुपयांप्रमाणे आकारणी सुरू केलेली आहे. घरपट्टीपेक्षा ‘युजर चार्जे’स आकारणी जास्त आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीकडून नागरिकांना जे विविध दाखले दिले जातात, त्यापोटी मोठी रक्कम आकारली जाते आहे.

-Ads-

नगरपंचायतीच्या सर्व 17 प्रभागांचा विचार करता, काही भागांमध्ये स्ट्रीट लाईट, गटारी, रस्ते नाहीत.नगरपंचायतीची स्वतःची शाळा, दवाखाना नाही. अग्निशमन वाहन नाही. तरीही ही आकारणी केली जाते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

अकोले नगरपंचायतीने जी करांमध्ये वाढ केली आहे, ती रद्द करण्यात यावी, म्हणून अकोलेकरांच्या वतीने गणेश कानवडे, रामदास शेटे, बाबासाहेब नाईकवाडी, सचिन शिंदे, अनिल शेटे, संतोष देठे, सुनील शेणकर, अनिल नाईकवाडी यांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा संगीता शेटे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन देण्यात आले. विविध करांमध्ये जी वाढ केलेली आहे, ती रद्द करण्यात यावी. अन्यथा अकोलेतील नागरिक आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)