संविधान दिन साजरा न करणाऱ्यांवर कारवाई करा

अकोले – तालुक्‍यातील कळस बु. ग्रामपंचायतीस संविधान दिनाचा विसर पडला. त्यामुळे कतर्कव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे व भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

26 नोव्हेंबर या दिवशी देशात संविधान दिन साजरा केला जातो. कळस बु. ग्रामपंचायतीत यावर्षी ग्रामपंचायतला चक्क संविधान दिनाचा विसर पडला आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम होणे आवश्‍यक होते. मात्र नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक हे कर्तव्यात कसूर करीत आहेत.

-Ads-

ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली. नंतर झालेल्या ग्रामसभेलाही ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातच संविधान दिन साजरा न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. उपसभापती मारुती मेंगाळ यांनाही निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)