केळी कोतूळला आगीत दोन बैलांचा मृत्यू

File photo

अकोले – तालुक्‍यातील केळी कोतूळ येथे गोठ्यास आग लागून दोन बैलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 1) पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोले तालुक्‍यातील केळी कोतूळ येथील भागा सोमा गोडे या आदिवासी शेतकऱ्याच्या घरास आणि गोठ्यास आग लागली. यावेळी घरातील सर्वच गाढ झोपेत होते. जेंव्हा बैलांच्या हंबरण्याचा आवाज आला, तेंव्हा भागा गोडे यांना जाग आली. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे ते वाचले.

दरम्यान आगीमुळे गोठ्यातील दावणीला बांधलेल्या दोन खिलार जातीच्या बैलांचा अक्षरशः जळून कोळसा झाला होता. या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, आग विझवताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बैलांचा डोळ्यादेखत झालेला कोळसा पाहून बैलमालक भागा गोडे यांना अश्रू अनावर झाले.

-Ads-

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अकोले तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आहेर व कामगार तलाठी यांनी जाऊन पंचनामा केला आहे. या आगीत एक दुभती गायही 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भाजली आहे. या आगीमुळे गोडे कुटुंब उघड्यावर आले असून, सुमारे पाच लाख रुपयांचे त्यांचे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)