सुरेश कोते यांना राष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

अकोले – कोतूळचे (ता. अकोले) सुपुत्र व महिला गृहउद्योग लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांना राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने राष्ट्रभूषण पुरस्कार नुकताच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार कोते यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, लिज्जत पापड उद्योगामुळे महिलांना उद्योग उपलब्ध होत असून, उदरनिर्वाहासाठी महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. यावेळी आमदार जगदीश मुळीक, डॉ. दत्तात्रय कोहीणकर, संदीप लंगे, सोमनाथ पठारे आदी उपस्थित होते.

-Ads-

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गायकवाड यांनी केले.आभार निखिल गायकवाड यांनी मानले. पुरस्काराबद्दल कोते यांचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी किसान सभा प्रांतीकचे उपाध्यक्ष मधुकरराव नवले आदींनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)