भंडारदरा धरणात आता बुडीत बंधारे

File Photo

अकोले – भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यासाठीच्या कामाचा सर्व्हे करून अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मुंबई येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावर सकारात्मक विचार करत ना.महाजन यांनी या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणी पातळी कमी जसजशी कमी होत जाते, तसतसे पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पायथ्याशी धरण असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, असे आ. पिचड म्हणाले.

हे टाळण्यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधल्यास पाणलोट क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा आशावादही आ.पिचड यांनी ना.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला.

यावर ना. महाजन यांनी आ. पिचड यांच्या प्रस्तावाचा विचार करत भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यासाठी या कामाचा सर्व्हे करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना ना. महाजन यांनी अधिकाऱ्यांना केल्या. माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी यापूर्वीच हा प्रस्ताव मांडला होता.

मात्र हा प्रश्न पुढे रेंगाळत गेला व मागे पडला. हाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. पिचड यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. ना. महाजन यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यामुळे आ. पिचड यांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)