‘भंडारदरा-निळवंडे’ धरणांच्या आवर्तनाचे नियोजन

संग्रहित छायाचित्र..

अकोले – भंडारदरा-निळवंडे धरणांतून शेतीसाठी तीन, तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. भंडारदरा-निळवंडे धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर या धरणांमध्ये शिल्लक असणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभवराव पिचड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते.

-Ads-

या दोन्ही धरणांमध्ये शिल्लक असणाऱ्या पाण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. यात शेतीसाठी रब्बीचे नुकतेच एक आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर रब्बीसाठी दुसरे आवर्तन 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान असणार आहे. त्यामुळे तब्बल दोन महिने प्रवरा पात्र कोरडे ठाक पडणार आहे.

उन्हाळ्यात शेतीसाठी 20 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत, असे एकूण शेतीसाठी तीन आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. याही कालावधीत प्रवरा पात्र किमान सव्वा महिना कोरडे पडणार आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी एकूण चार आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र त्याचे वेळापत्रक समजू शकले नाही. या नियोजनानुसार जर आवर्तने झाली, तर पिण्याच्या पाण्यावरून रणकंदन माजणार, हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)