कोतूळ येथे अथर्वशीर्ष पठण

अकोले – तालुक्‍यातील कोतूळसारख्या ग्रामीण भागात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेकडो भाविकांचा वाढता प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले.
बरोबर पहाटे सहा वाजता ओमकाराच्या गजराने अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात झाली.

हरी: ओम नमस्ते गणपतये!! त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि!! त्वमेव केवलं कर्तासि!! हा मंत्रोच्चार पहाटेच्या शांत वातावरणात हजारो गणेश भक्‍तांच्या मुखातून एकाच वेळी उमटला. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते.

श्री गणेशाची उपासना ही ऐक्‍य व बंधूभाव वाढवणारी, राष्ट्रीय एकात्मता, कार्यक्षमता वाढवणारी आहे. त्यामुळे कोतूळच्या प्राचीन श्री वरदविनायक मंदिरात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने षीपंचमीनिमित्त अथर्वशीर्षाचे पठण आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती संयोजक पेपर विक्रेते प्रदीप भाटे यांनी दिली.

या वेळी सविता घाटकर, प्रज्ञा भाटे, द्वारका पोखरकर, वृषाली समुद्र, शुभांगी खाडे, मीना आरोटे, विद्या परशुरामी यांनी अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व केले. पुष्पा सोपान देशमुख यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी सरपंच लीलाबाई धराडे, माजी सरपंच रमेश भुजबळ, माजी उपसरपंच गणेश पोखरकर, ज्ञानदेव देशमुख, डॉ. सुभाष सोमण, ईश्‍वर महाराज शास्त्री, प्रा. मच्छिंद्र देशमुख, ज्ञानेश्‍वर कोते, उत्तम देशमुख, दीपक राऊत, पुरुषोत्तम परशुरामी, राजेंद्र देशमुख, सुनील काळे, रावजी धराडे, कुलदीप नेवासकर, रवींद्र वाकचौरे, अनिल पाठक, भानुदास घाटकर, संजय वरसाळे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे, अजित दिघे, वासुदेव साळुंके, संतोष नेवासकर, गणेश गिऱ्हे, श्रीकांत गायकवाड, विजय तोरकडे, तुकाराम आरोटे, गणेश आरोटे, मुकुंद खाडे, प्रा. संभाजी पोखरकर, विनय समुद्र, विशाल बोऱ्हाडे, सचिन पाटील, निवृत्ती पोखरकर, वर्षा नेवासकर, वंदना वैद्य, वंदना पाठक आदींनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)