जायकवाडीला पाणी सोडण्यास 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; प्रशासनाचा निर्णय

अकोले – गेल्या आठ दिवसांपासून उत्तर नगर जिल्ह्यात जायकवाडीला पाणी सोडण्यावरून रणकंदन माजले आहे. त्यात अकोले तालुका दुष्काळी जाहीर करा, या मागणीसह जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वपक्षीय पाणी बचाव कृती समितीने सरकारला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्‍न लक्षात घेऊन, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्यास अखेर 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगोदर दुष्काळ जाहीर करा, मगच जायकवाडी पाणी सोडा, अन्यथा जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला होता. आज आवर्तन सोडण्याला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने 31 ऑक्‍टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील आंदोलकांनी स्थगिती आदेशाचे स्वागत केले.

महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहीरकर यांनी न्यायालयाने जायकवाडीत आवर्तन सोडू नये, असे आदेश दिल्याचा हवाला देऊन नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाटबंधारे विभागाला 31 पर्यंत ऊर्ध्व गोदावरी धरणसमूहातील जलाशयांतील पाणी सोडू नये, असे नाशिक जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांना दूरध्वनीवरून कळवले आहे. कुलकर्णी यांनी मेलद्वारे हा आदेश नगर व नाशिक जिल्ह्यांतील अधिकारी वर्गाला कळवला आहे. या आदेशाची माहिती आज दुपारी भंडारदरा धरणाचे कार्यकारी अभियंता रामनाथ आरोटे यांनी प्रवरा पुलावर ठिय्या आंदोलनास बसलेल्या बसलेल्या आंदोलकांना दिली.

कुलकर्णी यांनी 30 ऑक्‍टोबरला नियोजित जायकवाडी आवर्तन सोडण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र आवर्तन सोडल्यास तणाव वाढणार होता. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी किमान 400 पोलीस बंदोबस्तासाठी आवश्‍यक होते. राज्य राखीव दलाच्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्या, शिवाय वीजपुरवठा खंडित करणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे निडल काढणे व अन्य सोपस्कार पार पाडण्याला अवधी लागणार आहे. ही बाब ध्यानी घेऊन हे आवर्तन पुढील आदेश येईपर्यंत तूर्त थांबवावे असे कळवले आहे.

आज या आदेशामुळे अकोले तालुका सर्व पक्षीय कृती समितीने प्रवरा नदीवरील अगस्ती पुलावर सुरू केल्या ठिय्या आंदोलना बळ मिळाले. मात्र जोपर्यंत अकोले तालुका “दुष्काळी’ म्हणून जाहीर होत नाही, तोपर्यंत हे ठिय्या साखळी आंदोलन सुरु राहील, असे आंदोलनाचे निमंत्रक आ. वैभवराव पिचड, माकपचे डॉ. अजित नवले व अन्य नेत्यांनी जाहीर केले. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला अगस्ती पूल वाहतुकीला बंदच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)