अकोले तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा – आ. पिचड

अकोले – अकोले तालुक्‍यात पाणी व चाऱ्याची परिस्थिती गंभीर असून, तालुक्‍यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार वैभवराव पिचड यांनी विधानसभेत केली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी त्यांनी अनेक वेळा मागणी केली. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात केला.

ते म्हणाले, अकोले तालुक्‍यात सुरुवातीला पेरणी प्रसंगी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला. त्यामुळे तालुक्‍यात गंभीर परस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदारांशीही पत्रव्यवहार केला आहे.

पहिल्या ट्रिगरमध्ये जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांचा समावेश असून, अकोले तालुक्‍याचा त्यामध्ये समावेश नाही. सन 2014 मध्ये याच सभागृहात चर्चा झाली होती, तेंव्हा सर्वच मंडळांमध्ये पर्जन्यमापक बसविले जातील. त्याप्रमाणे त्याची माहिती घेऊन अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळाबाबत निर्णय घेतले जातील, असे सांगितले होते.

पण आज माझ्या तालुक्‍यातील तीन मंडळांत पाऊस झाला आहे. इतर पाच मंडळांमध्ये दुष्कळाची परिस्थिती आहे. मात्र संपूर्ण तालुक्‍याला हेच निकष लावून अन्याय केला आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे अकोले तालुका तत्काळ दुष्काळी जाहीर करण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आ. पिचड यांनी मांडली.

अकोले तालुक्‍यातील पूर्वेकडील पाणी आढळा धरणात वळविण्याचा बिताका प्रकल्प असून, त्यामुळे आढळा धरण भरण्यास मदत होते. हा प्रकल्प मंजूर असून, त्यासाठी निधीही आहे. परंतु हे कामे का होत नाही ? ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत. तालुक्‍यातील 17 गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेतून कामे मंजूर आहेत. तीही तातडतीने सुरू करावी, अशी मागणीही आ. पिचड यांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)