केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले

File photo

शेतकरी संघटनेचे डाॅ. अजित नवले यांचा आरोप

अकोले – केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी आधारभाव जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दृष्टीने ही वाढ करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतीमालाच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता करण्यात आलेली वाढ अत्यंत तुटपुंजी आहे, असा आरोप शेतकरी समन्वय समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

-Ads-

दि. 2 ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी हमीभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांवर राजधानीच्या सीमेवर “अमानुष लाठीचार्ज’ करण्यात आला. “लाठीचार्ज’च्या जखमांवर “रास्त हमीभाव’ जाहीर करून मलम लावण्याऐवजी हमी भावात अत्यल्प वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.

सरकारच्या महागाई वाढविणाऱ्या धोरणांमुळे शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव शंभरीकडे वाटचाल करत आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिकांचे उत्पन्न घटणार आहे. परिणामी उत्पादन खर्चात आणखी वाढ होत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने गव्हाला केवळ 105, हरभऱ्याला 220, मसुरीला 225, तर मोहरीला 200 इतकी अत्यंत तुटपुंजी वाढ केली आहे.असे त्यात नमूद केले आहे.

या तुटपुंज्या वाढीबद्दल असमाधान व्यक्त करून वाढीव उत्पादन खर्च व घटणारे उत्पादन याचा विचार करता रब्बीच्या आधारभावात रास्त वाढ करावी अशी मागणीही डॉ. नवले यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)