अकोले – श्रीकृष्णाने पेंद्या, सुदामा यांना सोबत घेवून अनेक लीला रचल्या. अशक्‍य ते शक्‍य करून दाखविले. एकत्रित काम केल्यास काहीच अशक्‍य नाही हा संदेश दिला, असे प्रतिपादन अगस्ती देवस्थानचे विश्‍वस्त दीपक देशमुख महाराज यांनी केले.

येथील अभिनव शिक्षण संस्थेतील कृष्णजन्माष्टमीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख महाराज म्हणाले की, आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांना परकीय भाषेचे शिक्षण देतात. यामुळे आपली संस्कृती लोप पावते की काय? असे वाटते. परंतु अभिनव शिक्षण संस्था याबाबतीत संस्कृतीची जपणूक करत विद्यार्थ्यांची सुसंस्कारीत पिढी घडवत आहे.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, रंजना नाईकवाडी, मंदा नवले, बबनराव नवले, ज्ञानदेव आरोटे, प्राचार्य जयश्री देशमुख, प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, प्राचार्य अल्फोन्सा डी., प्राचार्य अपर्णा श्रीवास्तव, प्रा. अनिल बेंद्रे, प्रा. पांडुरंग गुंजाळ, राधिका नवले, प्राचार्य दीप्ती शेटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत मंडलिक, प्रिया नवले यांनी केले. इंद्रभान कोल्हाळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)