ओळखीच्या बहाण्याने तीन लाख लांबवले

अकोलेतील प्रकार : निवृत्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास लुटले

अकोले : निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बॅकेतून पैसे काढून जात असताना, ओळख असल्याचा बहाणा करून तीन लाख रुपये लंपास करण्याचा प्रकार अकोलेत घडला. गुलाम महमंद रुस्तुमखान पठाण (रा. इस्लामपेठ, अकोले ) यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पठाण दुपारी पतसंस्थेतून 3 लाख रुपये काढून महात्मा फुले चौकातून घरी जात होते. यावेळी अनोळखी इसमाने ओळख असल्याचे भासवत पठाण यांना चहा पिण्याचा आग्रह करत मोटारसायकलवर बसवले. मात्र मध्येच फोन आल्याचा बहाणा करून पठाण यांना मोटारसायकलवरुन उतरवून त्याच्याजवळील 3 लाख रुपयेची रक्कम असलेली पिशवी घेऊन तो अनोळखी इसम पसार झाला. येथील अगस्ती पतसंस्था ते शिवाजी चौक दरम्यान ही घटना घडली.

पठाण यांच्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.सागर निपसे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)