अकोले येथे भाजपचे आत्मक्‍लेश आंदोलन

अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मधुकरराव पिचड यांच्यावर हुकूमशाही करीत असल्याचा आरोप करत भाजपाने तहसील कार्यालयासमोर आत्मक्‍लेश आंदोलन केले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाजपचे देवठाण गटाचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांचे भाषण बंद करून पिचड यांनी हुकूमशाही प्रवृत्तीचे रूप दाखवले.

याचा निषेध म्हणून आत्मक्‍लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख व सहकार आयुक्त यांची भेट घेणार आहे, असे भाजप नेते नितीन उदमले यांनी सांगितले

देवठाण जिल्हा परिषद गटातील ऊस उत्पादकांचे प्रतिनिधीत्व जालिंदर वाकचौरे करतात. ऊस उत्पादकांच्या प्रतिनिधीचे भाषण बंद करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. वेळोवेळी बहुजन समाजाच्या नेत्यांना बोलण्यास मज्जाव करण्याचा प्रकार घडले असल्याचे शिवाजीराव धुमाळ यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी सामान्य शेतकऱ्यांशी दडपशाही करीत असल्याचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मनकर यांनी सांगितले.

यावेळी जि.प. सदस्य डॉ किरण लहामटे, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऍड. नेताजी आरोटे, पं.स. सदस्य दत्ता देशमुख, उर्मिला राऊत, देवराम सामेरे, दत्ता बोऱ्हाडे, माणिक देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, अमोल कोटकर, सूर्यभान दातीर, सुभाष वाकचौरे, आदिवासी आघाडीचे पांडुरंग पथवे उपस्थित होते. शेवटी आभार भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)