आढळा खोऱ्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

संग्रहित छायाचित्र

अकोले – तालुक्‍यातील पश्‍चिमेला जरी जोरदार पाऊस पडून ओल्या दुष्काळाची चिन्हे आहेत. मात्र आढळा खोऱ्यात पावसाअभावी पिके होरपळत आहेत. त्यामुळे आढळा खोऱ्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते कैलास जाधव यांनी केली आहे. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव पाट (ता. अकोले) येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी त्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी मच्छिंद्र सहाणे, सचिन पवार, गुलाब गावंडे, सुभाष नेहे, बाळासाहेब गावंडे, मोहन सहाणे आदी शेतकरी उपस्थित होते.

देवठाण येथील माजी पं. स. सदस्य अरुण शेळके, बाजार समिती सदस्य सुधीर शेळके, पंढरी शेळके, मोहन शेळके, अशोक शेळके, भास्करराव बोडके, किरण शेळके, सूर्यभान सहाणे, रामहरी सहाणे, मुरली पथवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

वीरगाव येथेही अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखान्याचे संचालक रामनाथ वाकचौरे, नानासाहेब थोरात, सुदाम तोरकड, संजय थोरात, मदन कुमकर, अंकुश थोरात, भागवत कुमकर, सोमनाथ कुमकर, भगवान अस्वले, सुरेश फटांगरे, सयाजी टेमगिरे आदींसह झालेल्या शेतकरी बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

पावसाच्या आकडेवारीवरून अंदाज लावू नका…

अकोल्याच्या पश्‍चिम भागात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे भरली. पिके सडून गेली आहेत. मात्र पूर्वेला आढळेत पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता प्रत्यक्ष स्थिती पाहून आढळा परिसराला वेगळा न्याय हवा, अशी मागणी जाधव यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)