अकोल्यात कारसह दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

संग्रहित छायाचित्र

अकोले – श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क उपविभागाच्या पथकाने अकोले तालुक्‍यातील बोटा-ब्राह्मणवाडा रस्त्यावर बदगी बेलापूर येथे कार पकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. यावेळी एक लाख 86 हजार 566 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीला जेरबंद केले.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोले तालुक्‍यातील चास, पिंपळदरी, ब्राह्मणवाडा, बदगी बेलापूर या परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त ओहळ, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. कदम, एस. आर. कुसळे, पोलीस उपनिरीक्षक अहिरराव, पो. कॉ. विजय पाटळे, जीवन चत्तर यांच्या पथकाने सापळा ही कारवाई केली.

बोटाहून (ता. संगमनेर) अकोले तालुक्‍यातील ब्राम्हणवाडा-बदगी बेलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कार (क्र. एमएच- 14 बीए- 3543) आली असता तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार भरधाव नेली. त्यानंतर या पथकाने कारचा पाठलाग करून तिला पकडले. कारमध्ये 444 देशी दारूच्या बाटल्या व 96 विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी अनिस बाबूभाई पटेल यास अटक केली. गाडीसह एकूण 1 लाख 86 हजार 566 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)